पिकअपच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : मुलुंड येथून दुचाकीवरून खारघर येथील महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिल्याने २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १२) सकाळच्या सुमारास मुंबई-पुणे मार्गावर जुईनगर रेल्वे स्थानकजवळ घडली. या अपघातानंतर पिकअपचालक पळून गेला असून, नेरूळ पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. अपघातातील मृत तरुणाचे नाव वयून अजय फणसळकर (२१) असे असून, तो मुलुंड पश्चिम येथील हिम्मत अपार्टमेंटमध्ये राहण्यास होता.
वयून खारघर मधील एनएमआयएमएस स्कूल ऑफ हॉस्पिटिलिटी मॅनेजमेंट येथील महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. गुरुवारी (ता. १२) सकाळी वयून हा नेहमीप्रमाणे त्याच्या मोटारसायकलने खारघर येथील महाविद्यालयात जात होता. या वेळी वयून मुंबई-पुणे महामार्गावरील जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ आला असताना, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका पिकअपचालकाने वयूनच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वयूनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर जखमीला कोणतीही मदत न करता पिकअपचालकाने आपले वाहन त्याच ठिकाणी सोडून घटनास्थळावरून पलायन केले. नेरूळ पोलिसांनी पळून गेलेल्या पिकअपचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.