पतीची पत्नीविरोधात तक्रार
घरात घुसून पोटच्या मुलालाच मारहाण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणे शहर पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी त्याच्या पत्नीने जबरदस्तीने प्रवेश करून पोटच्या मुलाला मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी तक्रारदार पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीविरोधात श्रीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित पोलिस कर्मचारी आई आणि मुलासोबत ठाण्यात राहत असून, ते २००८ पासून ठाणे शहर पोलिस दलात कार्यरत आहेत. ते आणि त्यांची पत्नी हे दोघे गेल्या तीन वर्षांपासून वेगळे राहत आहेत. त्यांच्या घटस्फोटाचा दावा ठाणे कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित आहे. बुधवारी (ता. ११) पोलिस कर्मचारी रात्रपाळीच्या कर्तव्यावर असताना घरी त्यांची आई व १२ वर्षीय मुलगा हे दोघेच होते. रात्री सुमारे १० वाजता मुलाने तक्रारदार वडिलांना फोन करून आई मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यानंतर ते तातडीने घरी पोहोचले असता त्यांच्या पत्नीने घरात घुसून त्यांच्या मुलाला ‘माझ्यासोबत ये’ असे म्हणत मारहाण करत असल्याचे आढळून आले. या वेळी मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजीलाही शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीही तक्रारदार यांच्या पत्नीने घरात येऊन मुलाला मारहाण केल्याचा आरोप तक्रारदार यांनी श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.