कोकण रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम तीव्र
फेब्रुवारीत ४१ हजार फुकटे प्रवासी जाळ्यात; दोन कोटी ४१ लाखांचा दंड वसूल, वर्षभरात साडेचार लाखांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : तिकिटाविना व अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कोकण रेल्वेने फेब्रुवारी २०२६ मध्ये विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या कारवाईत ४१ हजार ५२२ विनातिकीट किंवा अनियमित प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून दोन कोटी ४१ लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली.
कोकण रेल्वे प्रशासनाने नियमित तपासणीसोबतच ८७३ विशेष तपासणी मोहिमा आयोजित केल्या होत्या. या मोहिमांमधून रेल्वे भाडे आणि दंडाच्या स्वरूपात ही रक्कम जमा करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये (फेब्रुवारी २०२६ पर्यंत) कोकण रेल्वेकडून एकूण १० हजार ३६८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या कारवाईत चार लाख ५४ हजार ८४९ अनधिकृत प्रवासाची प्रकरणे उघडकीस आली असून, त्यांच्याकडून एकूण २५ कोटी २१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
दरम्यान, आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तिकीट तपासणी अधिक कडक करण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे. रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण मार्गावर ही मोहीम राबवली जाणार आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.