मुंबई

जप्त केलेली रक्कम व्याजासह परत करा

CD

जप्त केलेली रक्कम व्याजासह परत करा
‘जीएसटी’संबंधित कारवाईप्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईस्थित एका व्यापाऱ्याविरोधात वस्तू व सेवा कर (जीएसटी) चौकटीअंतर्गत गुप्तहेर संचालनालयाकडून (डीजीजीआय) केलेली कारवाई विकृत, मनमानी आणि कायदेशीर अधिकारांशिवाय असल्याचे निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले आणि व्यापाराविरोधातील कारवाई रद्द केली. यामध्ये रोख रक्कम जमा केल्याने उच्च न्यायालयाने ‘डीजीजीआय’वर ताशेरे ओढत जप्त केलेली रक्कम व्याजासह दोन आठवड्यांत परत करण्याचे आदेश दिले.

‘डीजीजीआय’ने चर्नी रोड येथील एका व्यापाऱ्याकडून एक कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. त्या कारवाईला व्यापारी स्मृती वाघधरे यांनी २०१७ मध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत जून २०२३ मध्ये काढलेल्या जप्तीच्या दोन आदेशांना आव्हान दिले होते. शोध-तपास परवान्यांच्या आधारे, अधिकाऱ्यांनी २७ आणि २८ जून २०२३ला वाघधरे यांच्याशी संबंधित चार ठिकाणांची झडती घेताना अधिकाऱ्यांनी एका ठिकाणावरून ६० लाख रुपये तर वाघधरेंच्या पालकांच्या घरातून ४० लाख रुपये जप्त केले होते; मात्र केंद्रीय जीएसटी कायद्याच्या कलम ६७ (२) अंतर्गत जप्त वस्तूंच्या कक्षेत रोख रकमेचा समावेश होत नाही, हे कलम केवळ वस्तू, कागदपत्रे, पुस्तके किंवा इतर गोष्टी जप्तीची परवानगी देते, असा दावा वाघधरे यांनी केला. तसेच, त्यामुळे डीजीजीआयची जप्तीची कारवाई बेकायदा असल्याचा युक्तिवाद करून ती रद्द करण्याची मागणी वाघधरे यांनी न्यायालयाकडे केली. तसेच जप्त केलेली रक्कम ही पालकांच्या वैद्यकीय उपचारांसाठी, आईच्या हृदयविकाराच्या उपचारांसाठी राखून ठेवल्याचेही सांगितले. दुसरीकडे, ही झडती वाघधरेंचे मित्र आणि मेसर्स लिओ फेरोमेटचे मालक हितेश छेडा यांच्या कथित बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटच्या तपासाचा एक भाग असल्याचा दावा करून डीजीजीआयने या याचिकेला विरोध केला होता. न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळून लावला.

प्रतिवादींची कृती मनमानी!
वाघधरेंवर केलेली कारवाई कायदेशीर प्रक्रियेचे पालन न केल्याचे अधोरेखित केले. याचिकाकर्तीची रोकड जप्त करण्याची प्रतिवादींची कृती ही विकृत, मनमानी असल्याचे न्या. कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. जप्त केलेली रक्कम ही कोणत्याही कार्यवाहीशी संबंधित होती, हे स्पष्ट केले नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. तसेच, एक कोटी रुपयांची रक्कम, त्यावर लागू होणाऱ्या व्याजासह, दोन आठवड्यांत वाघधरेंना परत करावी, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

श्रेयस, सॅमसन की पांड्या... टीम इंडियाच्या नवा ट्वेंटी-२० कर्णधार कोण? BCCI ने अखेर उत्तर दिले; म्हणाले, सूर्यकुमार यादवला बदलण्याची चर्चा...

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमध्ये बाजारात भीषण बॉम्बस्फोट; नऊ जण ठार, ३० जखमी

Mumbai: धारावी पुनर्विकासासाठी नगरसेवक रणांगणात; ‘प्रलंबित’ प्रकरणांचा होणार अखेर निर्णय, तिढा सुटणार!

SCROLL FOR NEXT