मुंबई

लहान प्राणी व पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीसाठी इन्सिनरेटरची सुविधा

CD

लहान प्राणी व पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीसाठी इन्सिनरेटरची सुविधा
महालक्ष्मी येथील प्राण्यांच्या रुग्णालयास भेट अश्विनी जोशी यांची भेट

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः मुंबई महापालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ताशी ५० किलो क्षमतेची इन्सिनरेटर यंत्रणा उभारण्यात आली असून, ती आता कार्यान्वित करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे प्राण्यांच्या मृतदेहांची सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे शक्य होईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली आहे.
महालक्ष्मी येथील लहान पाळीव प्राण्यांच्या अत्याधुनिक रुग्णालयास डॉ. अश्विनी जोशी यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक आयुक्त (जी दक्षिण) स्वप्नजा क्षीरसागर, पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण, रुग्णालयाचे संचालक मेहेरनोश कपाडिया, रुग्णालय प्रशासन आणि सेवा प्रमुख मेजर जनरल प्रमोद बत्रा आदीं या वेळी उपस्थित होते.
पालिकेच्या सहकार्याने टाटा ट्रस्टच्या वतीने महालक्ष्मी येथे लहान प्राण्यांचे रुग्णालय कार्यरत आहे. चार मजली इमारतीतील या रुग्णालयात चार सुसज्ज शस्त्रक्रियागृह, तज्ज्ञ पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांसह स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग, सुमारे २०० प्राण्यांची उपचार क्षमता, जनरल वॉर्ड, आयसीयू आणि हाय डेपेंडन्सी युनिट, एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, अल्ट्रासोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब आणि २-डी इको यासारख्या अत्याधुनिक निदान सुविधा येथे उपलब्ध आहेत. तसेच, प्राण्यांसाठी रक्तपेढी, दंत उपचार, त्वचारोग, नेत्रचिकित्सा, एंडोस्कोपी, फिजिओथेरपी आणि हायड्रोथेरपी यासारख्या विशेष उपचार सुविधाही येथे आहेत. लहान प्राण्यांसाठी एकाच छताखाली बहुउद्देशीय सेवा-सुविधा, अत्याधुनिक निदान आणि उपचार सुविधांनी सुसज्ज असलेले हे देशातील अग्रगण्य रुग्णालय आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT