मुंबई

आठ दिवसांत अहवाल द्या – उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

CD

अंबरनाथ एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांचे फायर-सेफ्टी ऑडिट तपासा
आठ दिवसांत अहवाल द्या ः उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
अंबरनाथ, ता. १४ (वार्ताहर) ः उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (ता. ११) रात्री उशिरा अंबरनाथमधील आनंदनगर एमआयडीसीला अचानक भेट दिली. नुकतेच भीषण आग लागलेल्या श्री गणेश केमिकल कंपनीचीही यावेळी पाहणी केली. एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपन्यांचे फायर आणि सेफ्टी ऑडिट झाले आहे की नाही याचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पाहणीदरम्यान सामंत यांनी अधिकाऱ्यांकडून परिसरातील कंपन्यांची माहिती घेतली. मात्र, काही अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील कंपन्यांबाबत पुरेशी माहिती नसल्याचे लक्षात येताच सामंतांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उद्योगांची माहिती नसणे ही शोकांतिका आहे, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सजग राहण्याचे निर्देश दिले. काही उद्योगांकडून नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास एमआयडीसीकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच इन्शुरन्स मिळवण्यासाठी जाणूनबुजून आगीच्या घटना घडवल्या जात असल्याचे आढळल्यास त्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगमंत्र्यांच्या या अचानक भेटीनंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या तातडीने हालचाली वाढल्याचे दिसून आले. यावेळी तहसीलदार अमित पुरी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, शिवसेना गटनेते रवी करंजुळे, नगरसेवक कुणाल भोईर, सुभाष साळुंके यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT