मुंबई

हवा प्रदूषणात भिवंडी ३३५ पार

CD

ठाण्याला प्रदूषणाचा विळखा
प्रदूषणात दिल्लीशी बरोबरी; भिवंडीने ओलांडली ३००निर्देशांकाची पातळी
राजीव डाके : सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. १४ : तलाव आणि निसर्गरम्य पर्यावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याची ओळख आता प्रदूषित क्षेत्र म्हणून होऊ लागली आहे. शनिवारी नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भिवंडीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३३३ वर पोहोचला असून, या शहराने प्रदूषणाच्या बाबतीत थेट दिल्लीलाही मागे टाकले आहे. दुसरीकडे १७७ एक्यूआयसह ठाणे शहराने दिल्लीशी बरोबरी केली असून, मुंबईच्या तुलनेत येथील हवा अधिक विषारी बनली आहे.

शुक्रवारी दुपारी भिवंडीचा निर्देशांक ४१६ पर्यंत गेला होता, तर शनिवारी सकाळी तो ३३३ वर स्थिरावला. वाढती गोदामे, अवजड वाहनांची वाहतूक आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे भिवंडी ‘गॅस चेंबर’ बनत चालली आहे. ठाणे शहरात ३५ पेक्षा जास्त तलाव आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मोठा भूभाग असूनही प्रशासकीय दुर्लक्षामुळे शहराची हवा विषारी झाली आहे. विविध विकासकामांच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आली आहे. शनिवारी ठाण्याचा हवा निर्देशांक १७७ नोंदवला गेला, जो दिल्लीच्या (१७७) बरोबरीचा आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या मुंबईला प्रदूषणात नेहमी पुढे मानले जायचे ती मुंबई १०६ निर्देशांकासह ठाणे आणि भिवंडीच्या तुलनेत अधिक सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यात केवळ प्रदूषणच नाही तर तापमानानेही उच्चांक गाठला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्याचे तापमान ४० सेल्सिअसच्या पार गेल्याने नागरिकांच्या जीवाची काहिली होत आहे. उष्णता आणि हवेतील वाढते धूलिकण यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि थकवा जाणवू लागला आहे.

प्रशासकीय यंत्रणेचे दावे
ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले, की शहरात सुरू असलेल्या विकासकामांना नियमावली बंधनकारक केली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळ त्यावर लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी संजीव रेदासानी यांनी सकाळी हवा थंड असल्याने प्रदूषणात वाढ दिसते, असा दावा केला आहे. मात्र पर्यावरणप्रेमींच्या मते प्रशासनाचा हा दावा फोल असून, उच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करून होणारी झाडांची कत्तल आणि धूळ नियंत्रणाकडे होणारे दुर्लक्ष यामुळेच ही परिस्थिती ओढवली आहे.

ठाण्यात नियमबाह्य पद्धतीने विकासकामे सुरू आहेत, हजारो झाडांच्या कत्तली होत आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या अटी-नियमांचा भंग होत आहे. त्यामुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या प्रदूषणाला प्रशासन जबाबदार आहे.
- रोहित जोशी, पर्यावरण अभ्यासक

प्रदूषणाची शहरनिहाय आकडेवारी
शहर हवा गुणवत्ता निर्देशांक
भिवंडी ३३३ (अत्यंत धोकादायक)
नवी मुंबई १८२
ठाणे १७७
दिल्ली १७७
पालघर १६६
मुंबई १०६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

Nashik Municipal Corporation : नाशिककरांनो सावधान! महापालिकेच्या सर्वेक्षणात दीड लाखांहून अधिक नळजोडण्या आढळल्या नियमबाह्य

Jim Corbett: जिम कॉर्बेटचा हाऊसफुल्ल! बुकिंग उघडताच काही मिनिटांत ४१ खोल्या बुक; करावी लागतेय वर्षभर प्रतीक्षा!

Ratnagiri Farmer : जिल्ह्यात सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका; विचित्र; वातावरण, कमाल तापमान ३८ अंशांवर, बागायतदार चिंतेत

SCROLL FOR NEXT