मुंबई

अंबरनाथमध्ये भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा रविवारी

CD

नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा
अंबरनाथ, ता. १४ (वार्ताहर) : भारतीय नववर्ष स्वागतयात्रा समिती यांच्या वतीने रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा रविवार (ता. १५) आयोजित केला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडणार असून निरुपणकार अलका मुतालिक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुळे पाटील व उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. स्मरणिका प्रकाशन सोहळ्यासोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम वडवली विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गावरील रोटरी सभागृह येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणार असून अंबरनाथमधील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. नववर्ष स्वागतयात्रा समितीचे अध्यक्ष प्रमोद नाटेकर, उपाध्यक्षा संगीता सरदेसाई, कार्यवाह रत्नाकर चांदसरकर, स्मरणिकाप्रमुख राजेंद्र कुलकर्णी यांनी शोभायात्रेसाठी नागरिकांनी पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT