मुंबई

अंबरनाथ पालिकेत तडकाफडकी बदल्या

CD

अंबरनाथ पालिकेत प्रशासकीय खांदेपालट
पंकज पन्हाळे नवे शहर अभियंता; राजेश तडवींकडे उपअभियंता पदाची धुरा

अंबरनाथ, ता. १४ (वार्ताहर) : अंबरनाथ नगरपालिकेत अंतर्गत स्तरावर मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, मुख्याधिकाऱ्यांच्या एका तडकाफडकी निर्णयाने पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या फेरबदलात पंकज पन्हाळे यांची शहर अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर वादग्रस्त ठरलेल्या मेघा कदम यांच्याकडील महत्त्वाचे विभाग काढून घेण्यात आले आहेत.

पालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता राजेश तडवी यांच्याकडे गेल्या काही महिन्यांपासून शहर अभियंता या पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र अचानक झालेल्या या बदलांमध्ये तडवी यांच्याकडील हा महत्त्वाचा पदभार काढून घेण्यात आला असून, त्यांना आता उपअभियंता पदावर काम करावे लागणार आहे. त्यांच्या जागी उपअभियंता पंकज पन्हाळे यांची शहर अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमागील नेमके प्रशासकीय कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी पालिका वर्तुळात यावरून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

व्हिडिओ व्हायरल होणे पडले महागात
मिळकत विभागाच्या पर्यवेक्षक मेघा कदम यांनाही या बदल्यांचा मोठा फटका बसला आहे. पालिकेच्या अधिकृत सभेत मोबाईलवर गेम खेळत असतानाचा कदम यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या प्रकारामुळे पालिकेची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा होती. अखेर त्याची दखल घेत प्रशासनाने कदम यांच्याकडील मिळकत आणि पर्यावरण विभागाचा कार्यभार काढून घेतला आहे. हा पदभार आता नवनीत देवरे यांच्याकडे सोपवण्यात आला असून, मेघा कदम यांच्याकडे सध्या केवळ निवड विभागाची जबाबदारी ठेवण्यात आली आहे.

चर्चांना उधाण
प्रशासकीय शिस्त आणि कार्यक्षमतेचा दाखला देत मुख्याधिकाऱ्यांनी केलेल्या या धाडसी बदलांमुळे इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या बदल्या केवळ प्रशासकीय आहेत की त्यामागे काही राजकीय किनार आहे, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT