नमाज पठणाच्या जागेवरून वाद
बजरंग दल, विहिंपची थीम कॉलेजविरोधात तक्रार
तारापूर, ता. १४ (बातमीदार) ः बोईसर पूर्वेतील थीम कॉलेजच्या परिसरात नमाज अदा करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे कारवाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे कॉलेज व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतही भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
बोईसर पूर्वेतील थीम कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मुस्लिम व्यवस्थापनाकडून ही संस्था चालवली जाते. कॉलेजच्या परिसरात मशिदीसदृश रचना उभारून नमाज अदा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र इतरधर्मीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच भारतीय संविधानातील अनुच्छेद २९ (२) नुसार सर्व नागरिकांना शिक्षणात समानतेचा अधिकार आहे; मात्र त्या अधिकाराचे या व्यवस्थेमुळे उल्लंघन होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
-----------------------------
...तर प्रशासन जबाबदार
या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे. तसेच कॉलेज परिसरात हनुमान चालिसाचे नित्य पाठ करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार असेल, असे निवेदनात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.