मुंबई

मोखाड्यातील विद्यार्थी इस्रो भेटीवर

CD

मोखाड्यातील विद्यार्थी इस्रो भेटीवर
पालघर शिक्षण विभागाचा विशेष उपक्रम
मोखाडा, ता. १४ (बातमीदार)ः आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी तसेच अंतराळ विज्ञानाबाबत प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने पालघर शिक्षण विभागाने (जिल्हा परिषद) विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मोखाडा तालुक्यातील सहा विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे शैक्षणिक भेट घेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अंतराळ अनुभवण्याची संधी आहे.
इस्रो भेटीसाठी मोखाडा तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा डोलारा येथे स्वरा पालवे (७वी), शेरीचा पाडा येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थी साईनाथ वाजे, आठवी इयत्तेतील ध्रुव घाटाळ, जिल्हा परिषद केंद्रशाळा बेरिस्ते येथील यश जाधव (इयत्ता ७वी), जिल्हा परिषद शाळा करोळचे शालिनी गिरे, निशा खडके (इयत्ता ८ वी) आणि जिल्हा परिषद शाळा शेरीचा पाड्याचे प्राथमिक शिक्षक युवराज महाले यांची निवड झाली आहे. १२ ते १५ मार्चदरम्यान या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे आदिवासी व अतिदुर्गम भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे.
----------------------------------------------
विज्ञानाची प्रत्यक्ष ओळख
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना उपग्रह प्रक्षेपण प्रक्रिया, अंतराळ संशोधनातील आधुनिक तंत्रज्ञान, विविध वैज्ञानिक प्रयोग, इस्रोच्या संशोधन कार्याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाची प्रत्यक्ष ओळख होणार असून, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राबद्दल त्यांच्यात अधिक उत्सुकता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मोखाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळालेली ही संधी प्रवासात महत्त्वाची ठरणार असून, अंतराळ संशोधन क्षेत्रातही भविष्यात योगदान देऊ शकतील, अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

Pune Gas Leak: पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती; २४ नागरिकांना त्रास, मोठा अनर्थ टळला!

Pune Water: भामा-आसखेड धरणातून तिसरे आवर्तन सुरू; ५०% पेक्षा अधिक साठ्यामुळे शेतीला दिलासा!

SCROLL FOR NEXT