मुंबई

सिलिंडरसाठी रांगांमुळे पोलखोल

CD

सिलिंडरसाठी रांगांमुळे पोलखोल
बोईसर परिसरात पुरवठा विस्कळित, ग्राहकांच्या रांगा
बोईसर, ता.१४ (वार्ताहर): जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणताही तुटवडा नसल्याचा दावा जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी केला आहे. मात्र, बोईसर परिसरातील अनेक भागांत सिलिंडरसाठी रांगा लागत असल्याने प्रशासनाची पोलखोल झाली आहे.
गॅस बुकिंगसाठी दिलेले दूरध्वनी क्रमांक लागत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. त्यामुळे अनेकांना थेट गॅस एजन्सीच्या कार्यालयात जाऊन बुकिंग करावी लागत आहे. यामुळे काही ठिकाणी सकाळपासूनच गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. एकीकडे प्रशासनाकडून पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत असला तरी बुकिंग प्रक्रियेतील अडचणींमुळे नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
-----------------------------
गॅस बुकिंगसाठी फोन लावला तरी लागत नाही. त्यामुळे एजन्सीसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. प्रशासन पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करत असले तरी प्रत्यक्षात गॅस मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.
़ः- पल्लवी पाटील, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime news : पुण्यात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या; मृतदेह झुडपात लपवला, मुंबई-बंगळूर महामार्गावर लोकांचा आक्रोश

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालमधील १४ केंद्रांवर आज फेरमतदान; केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

लग्नाचे नाव घेताच, पलटला... मोहम्मद शमीच्या भावावर महिलेचे गंभीर आरोप

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT