वरिष्ठ अभियंत्यांना शिस्तभंगाची नोटीस
निमंत्रण पत्रिकेतून लोकप्रतिनिधींची नावे डावलल्याने कारवाई
विरार, ता.१४(बातमीदार)ः वसई-विरार पालिकेच्या प्रभाग समिती ए च्या इमारत लोकार्पण, चंदनसार येथील ट्रॉमा सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून लोकप्रतिनिधींची नावे डावलण्यात आली होती. या प्रकरणात दोघा वरिष्ठ अभियंत्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे.
भाजपचे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा, वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांची नावे निमंत्रण पत्रिकेतून वगळल्यामुळे, तसेच नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांचे नाव राजशिष्टाचार डावलून माजी पदाधिकाऱ्यांच्या नंतर छापल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. या प्रकाराविरोधात विरोधी पक्षनेते मनोज पाटील गटनेते अशोक शेळके, जिल्हा अध्यक्षा प्रज्ञा पाटील यांच्या नेतृत्वात भाजपच्या ४३ नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयात धरणे आंदोलन केले. यावेळी शिष्टमंडळाने महापौर अजीव पाटील, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी आणि अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी लोकप्रतिनिधींचा अवमान करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावरकठोर कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानुसार शहर अभियंता प्रदीप पाचंगे, उपअभियंता सतीश सूर्यवंशी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अन्वये शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.