घरगुती गॅसचा सुरळित पुरवठा
जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांची माहिती
पालघर, ता.१४ (बातमीदार): जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजीचा तुटवडा असल्याची परिस्थिती उद्भवली आहे. मात्र, ही अफवा असून घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच अनावश्यक घाईगडबड करून गॅस सिलिंडर साठवण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. घरगुती एलपीजी गॅस हा केवळ घरगुती वापरासाठीच असल्याने त्याचा व्यावसायिक अथवा अनधिकृत वापर केल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. यावेळी काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलिडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचा कालावधी ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे एका सिलेंडरचे वितरण झाल्यानंतर २५ दिवस झाल्यावर पुढील सिलिंडरचे बुकिंग करता येते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.