मुंबई

वसईतील खवय्यांची गैरसोय

CD

वसईतील खवय्यांची गैरसोय
सिलिंडर नसल्याने खाद्यपदार्थांची दुकाने बंद

वसई, ता. १४ (बातमीदार) ः इराण, अमेरिका, इस्राईल देशात युद्धजन्य परिस्थिती आहे. त्याची झळ वसईच्या दिशेने पोहोचली असून रस्त्यावर खाद्यविक्री करणारी दुकाने सिलिंडर मिळत नसल्याने बंद होऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
व्यावसायिक सिलिंडरअभावी काही दिवसांपूर्वी हॉटेल व्यावसायिकांनी चक्क चूल पेटवल्याचे दिसून आले. खाद्यपदार्थ शिजवताना सिलिंडरचा वापर होत असतो; परंतु सिलिंडर लवकर मिळत नसल्याने नामुष्की निर्माण झाली आहे. हॉटेल व्यावसायिकाने सिलिंडर वेळेत मिळावे, अशी मागणी केली आहे. सकाळी नाश्ता विक्री करण्यासाठी सायकलवर किंवा रस्त्याच्या कडेला इडली, मेदू वडा, पोहे, उमपा, वडा विक्री करणारे तसेच दुकानात पाणीपुरीसह उपाहारगृहापर्यंत सिलिंडरचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
-----------------------------------
दुकानांना टाळे
- सकाळपासून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ग्राहकांची होणारी गर्दी पाहता विक्रेत्यांना उसंत मिळत नाही, अशी परिस्थिती होती; मात्र सिलिंडर मिळत नसल्याने मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दुकानांना विक्रेत्यांनी टाळे लावल्याचे दिसून येत आहे.
- व्यावसायिक हॉटेलमध्ये राहणारे कर्मचारी, त्यांचे वेतन तसेच अन्य खर्च मालक, चालकाला करावा लागतो. ग्राहकांना खाद्यपदार्थ देण्यास अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT