रजनीकांतभाई श्रॉफ यांचा गौरवपत्राने सन्मान
पालघर, ता. १५ : समाजसेवा, शिक्षण क्षेत्रातील कार्य आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व याबद्दल चिंचणी-तारापूर शिक्षण संस्थेचे चेअरमन रजनीकांतभाई श्रॉफ यांचा युवक बिरादरी (भारत) संस्थेतर्फे गौरवपत्राने सन्मान करण्यात आला. यूडीसीटी मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर प्रारंभीच्या काळात श्रॉफ यांनी अभियंता म्हणून आयआयएम अहमदाबाद प्रकल्पात सेवा बजावली आहे. त्यानंतर १९६६ मध्ये त्यांनी चिंचणी-तारापूर या शैक्षणिक संस्थेच्या चेअरमनपदाची धुरा हाती घेतली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज हा परिसर शिक्षण, सेवा आणि संवेदनशीलतेचा संगम असलेले केंद्र म्हणून ओळखला जात आहे.
श्रॉफ यांच्या दूरदृष्टी, गांधीवादी विचारसरणी, पारदर्शक व्यक्तिमत्त्व आणि सात्त्विक जीवनमूल्यांमुळे समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे. त्यांनी नेहमी शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व देत शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवले.
‘केजी-टू-पीजी’सारखे उपक्रम, संस्थेचा वेब विस्तार, विकासनीती आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे हजारो युवक-युवतींना सक्षम होण्याची संधी मिळाली असून त्यांनी आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
मुंबईतील वैभवशाली जीवन सोडून चिंचणीला जन्मभूमी व कर्मभूमी मानत, चिंचणी-तारापूर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश देणारे रजनीकांतभाई श्रॉफ हे खऱ्या अर्थाने वंदनीय शिक्षणतज्ज्ञ ठरले आहेत. त्या कार्याचा सन्मान म्हणून युवक बिरादरीने त्यांचा सत्कार केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.