नागरिकांना एकाच दिवशी शासकीय सेवांचा लाभ
आशागड येथे महसूल समाधान शिबिर उत्साहात
कासा, ता. १४ (बातमीदार) : डहाणू तालुक्याच्या आशागड येथील शामराव परुळेकर महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा पहिला टप्पा शनिवार (ता. १४) यशस्वीपणे पार पडला. या शिबिरातून नागरिकांना ‘एकदिवसीय सेवा वितरण’ संकल्पनेनुसार विविध शासकीय सेवा पुरवण्यात आल्या.
या शिबिरात आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना रेशन कार्ड, जातीचे दाखले, तळघराचे प्रमाणपत्र, आभा कार्ड, सातबारा इत्यादी महत्त्वाच्या कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. याशिवाय महसूल विभागातील तलाठी अधिकाऱ्यांना आधुनिक कामकाजासाठी लॅपटॉपचेही वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी, नायब तहसीलदार, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतींचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये सोगवे सरपंच लहानी दौडा, डेहणे सरपंच दत्तात्रय भोंडवा, चरी-कोटबी सरपंच वसुंधरा कलांगडा, आसवे सरपंच गुरोडा तसेच आशागड उपसरपंच दिलपेश दौडा यांचा समावेश होता.
या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि आवश्यक कागदपत्रे एकाच ठिकाणी जलद गतीने उपलब्ध व्हावीत, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे या वेळी सांगण्यात आले. परिसरातील लाभार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घेतला. त्यामुळे या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.