मुंबई

पेण शहरात भिक्खु महासंघाचे आगमन

CD

पेण शहरात भिक्खु महासंघाचे आगमन
बौद्ध बांधवांकडून ठिकठिकाणी स्वागत
पेण, ता. १४ (वार्ताहर) : भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्हा अंतर्गत पेण तालुका शाखेच्या वतीने वाशी येथील लुंबिनी बुद्ध विहार येथे ता. ७ ते १६ मार्च या कालावधीत श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्‍घाटन महासभेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुशील वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
या श्रामणेर शिबिरासाठी आलेल्या भिक्खु संघाचे शनिवारी पेण शहरात आगमन झाले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भिक्खु संघाने अभिवादन करून पुढील प्रस्थान केले. त्यानंतर बौद्ध नगर मार्गे डोंगरी येथील विहारापर्यंत भिक्खु संघाचे स्वागत करण्यात आले.
या दरम्यान शहरातील बौद्ध बांधवांकडून ठिकठिकाणी भिक्खु संघाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षक राजेंद्र बाविस्कर, पेण तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे तसेच तालुक्यातील पदाधिकारी व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT