श्रीवर्धन येथे महा आरोग्य शिबिराचे आयोजन
श्रीवर्धन, ता. १४ (वार्ताहर) : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी (ता. १२) श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष अतुल चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उपनगराध्यक्ष अनंत गुरव, नगरसेवक तसेच डॉ. कौस्तुभ जोशी, डॉ. मधुकर ढवळे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीवर्धन तालुका व शहर शाखेच्या वतीने आयोजित या शिबिरात एकूण ४५९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. तसेच २५२ गरजू रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच दुर्गम भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा एकाच छताखाली मोफत उपलब्ध व्हाव्यात हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिरासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच नेरुळ येथील वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष सहकार्य लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.