मुंबई

भांडुपमध्ये आधारभिंत कोसळली

CD

भांडुपमध्ये आधार भिंत कोसळली; घरे, सार्वजनिक सुविधांना धोका
मुलुंड, ता. १४ (बातमीदार) : भांडुप पश्चिम येथील साई हिल परिसरात दीपक शिंदे चाळीजवळ असलेली आधार भिंत गुरुवारी (ता. १२) रात्री अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भिंत कोसळल्यानंतर परिसरातील जमीन खचल्याने जवळील घरे आणि सार्वजनिक सुविधांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ही आधार भिंत गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत धोकादायक अवस्थेत होती. भिंतीखाली उंदरांनी मोठ्या प्रमाणात बिळे केलेली होती तसेच पावसाचे पाणी सतत झिरपत असल्याने भिंतीची मजबुती कमी झाली होती. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही आवश्यक दुरुस्ती करण्यात आली नव्हती. अखेर गुरुवारी रात्री भिंत अचानक कोसळल्याने परिसरातील माती मोठ्या प्रमाणात खचली.
भिंत कोसळल्यानंतर जवळील सार्वजनिक शौचालय तसेच काही घरांच्या पायाभूत रचनेवर परिणाम झाला आहे. काही घरे धोकादायक स्थितीत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक ११४ मधील शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी म्हाडा, तहसीलदार कार्यालय आणि पालिका प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. खचलेल्या भागात मजबूत आरसीसी आधार भिंत उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या वेळी म्हाडा, पालिका आणि तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच शिवसेना विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अन्यथा भविष्यातील दुर्घटनेसाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT