उलवेत रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग
भंगाराच्या दुकानांमुळे नागरिक त्रस्त
उलवे, ता. १४ (बातमीदार) : उलवे नोडमधील सेक्टर २, ३, ५ आणि ६ परिसरात रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. भंगाराच्या दुकानांमुळे कागद, प्लास्टिक, पुठ्ठे आणि इतर कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ दिसत असून दुर्गंधीही पसरत आहे.
काही ठिकाणी भंगार गोळा करणाऱ्यांनी रस्त्यालगत तात्पुरत्या झोपड्या उभारून कचऱ्याचे वर्गीकरण सुरू केले आहे. त्यामुळे फुटपाथ तसेच रस्त्याचा काही भाग व्यापला जात असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. कचऱ्याच्या ढिगांमुळे उंदीर, डास आणि भटक्या प्राण्यांचा त्रास वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
परिसरात सिडकोकडून स्वच्छता सेवा देण्यासाठी एजन्सी नियुक्त केल्याचे फलक लावण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कचऱ्याचे ढीग कायम असल्याने स्वच्छता व्यवस्थेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
चौकट
प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी
या समस्येमुळे परिसरातील रहिवासी, दुकानदार आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कचरा हटवून रस्त्यालगत सुरू असलेली भंगाराची दुकाने हटवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.