कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रात किसान सन्मान निधी कार्यक्रम उत्साहात
वाणगाव, ता. १४ (बातमीदार) : कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे दूरदृश्य प्रणालीद्वारे किसान सन्मान निधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन किसान सन्मान निधी योजनेद्वारे लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर निविष्ठा खरेदी खर्च, नैसर्गिक आपत्ती किंवा तातडीच्या गरजांमध्ये मोठा आधार ठरत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पालघरचे उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे यांनी काळानुरूप शेतीत बदल करणे आवश्यक असल्याचे सांगून शेती तंत्रज्ञान तसेच योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे यांनी विकसित केलेली विविध ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी डॉ. जगन सूर्यवंशी, कृषी अधिकारी जगदीश पाटील, पंचायत समिती डहाणूचे विस्तार अधिकारी पंढरीनाथ पाटील, किशोरी विशे, अनिलकुमार सिंग, प्रशांत वरठा, दामिनी तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शास्त्रज्ञ अशोक भोईर यांनी केले. कार्यक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
--------
कार्यक्रमात शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. या निधीतून काही शेतकऱ्यांनी शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा खरेदी केल्याचे सांगून ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगत शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करणारी असल्याचे सहभागी शेतकऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.