गावदेवी आरोग्य केंद्राची पाहणी
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा
पनवेल, ता. १४ (बातमीदार) : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (११ मार्च) गावदेवी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक १ येथे पाहणी करण्यात आली.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण समितीचे संचालक डॉ. सरोज कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या केंद्राला भेट देत विविध वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. पथकात एनसीडी व डब्ल्यूएचओचे टीम लीड डॉ. अभिषेक कुँवर, एनसीएस सल्लागार डॉ. आशीष भट्ट तसेच राज्य एनसीडी समन्वयक डॉ. आनंद सोनटक्के यांचा समावेश होता. या पथकाने आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, तपासण्या आणि उपचार व्यवस्थेची माहिती घेतली.
पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा, औषधे तसेच विविध तपासण्यांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. अनमोल ठाकूर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
गंभीर आजारांची मोफत तपासणी
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मधुमेह, उच्च रक्तदाब, मुख कर्करोग, स्तन कर्करोग तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या आजारांची तपासणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नियमितपणे केली जाते. या माध्यमातून नागरिकांना लवकर निदान व उपचाराची सुविधा उपलब्ध होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.