मुंबई

सानपाडा परिसरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ

CD

सानपाडा परिसरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : सानपाडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. विशेषतः दुचाकी, तीन चाकी वाहने आणि वाहनांच्या सुट्या भागांच्या चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या दुचाकी आणि रिक्षा चोरीला जाण्याच्या घटना समोर येत आहेत. तसेच काही प्रकरणांमध्ये वाहनांचे महत्त्वाचे सुटे भाग बॅटरी, मिरर, टायर, तसेच इतर यांत्रिक भाग काढून नेले जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक वेळा वाहने इमारतींच्या आवारात किंवा रस्त्याच्या कडेला उभी असतानाही चोरीच्या घटना घडत आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चोरट्यांना पकडणे कठीण जात असल्याचीही तक्रार नागरिकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

नियमित गस्त घालण्याची मागणी
विशेषतः संवेदनशील भागांमध्ये नियमित गस्त घालावी, तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनीही आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत, तसेच शक्य असल्यास अतिरिक्त लॉक व सुरक्षा उपायांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. या वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा सानपाडा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सेक्टर २ पासून सेक्टर १० च्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्वी या परिसराजवळ पोलीस ठाणे असल्याने फरक होता, परंतु नवीन पोलिस ठाणे आमच्या परिसरापासून दूर गेल्याने कदाचित या घटनांमध्ये वाढ झाली असावी. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवणे आवश्यक आहे.
- सागर जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT