मुंबई

शिवकालीन इतिहासाला उजाळा

CD

शिवकालीन इतिहासाला उजाळा
मोखाड्यात विद्यार्थ्यांनी हाताळली शस्त्रे

मोखाडा, ता. १४ (बातमीदार) ः शालेय अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे अध्ययन विद्यार्थी करतात. त्यामध्ये अनेक शस्त्रांचाही अभ्यास विद्यार्थ्यांनी केला आहे. या शस्त्रांना प्रत्यक्ष पाहण्याची संधी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मिळाली.
सह्याद्री शिलेदार प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन पाचघर येथे भरवले होते. शिबिरात करोळ, कडूचीवाडी, किनिस्ते, कोचाळे, वावळ्याची वाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोदवला. या वेळी प्रदर्शनात ढाल, भाला, तलवार, दांडपट्टा, चिलखत, तलवार शस्त्रांसह २०० अनेक दुर्मिळ शस्त्रे बघावयास मिळाली. शिवाजी महाराज यांचे छायाचित्र वाघनखे, धनुष्य-बाणाचे छायाचित्र विद्यार्थ्यांनी अनुभवले आहे. करोळ-पाचघर ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र येले यांच्या पुढाकारातून हा उपक्रम करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Summer Health Tips: उन्हाळा आला…आरोग्याची काळजी घ्या! तब्येत सांभाळण्यासाठी काय खावं, काय टाळावं ते जाणून घ्या

Latest Marathi Live Update : नाशिकमध्ये परप्रांतीय ठेकेदाराकडून सुपरवायझरला बेदम मारहाण

LPG Gas Shortage: वडापाव चाळिशीपार, चहा तिशीला! चाकण औद्योगिक वसाहतीतील स्थिती; भजी खाणेही आवाक्याबाहेर

SCROLL FOR NEXT