भूमिगत बहुस्तरीय वाहनतळ प्रकल्प राबवण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : ‘महापालिकेतील रिकामे भूखंड, उद्याने, मैदाने अशा ठिकाणी भूमिगत बहुस्तरीय वाहनतळ प्रकल्प राबविण्यात यावेत, जेणेकरून शहरातील वाहनतळांची समस्या सोडविण्यास हातभार लागेल,’ अशा ठरावाच्या सूचनेच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे विजयेंद्र शिंदे यांनी मागणी केली आहे.
मुंबई हे शहर जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे; मात्र या शहरात दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, वाहनांच्या संख्येत होणारी वाढ, शहराबाहेरून येणारी वाहने यामुळे मुंबईतील प्रवास त्रासदायक होत आहे. सोबतच वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. शहर आणि उपनगरात पार्किंगची संख्या अधिक गंभीर बनली असून मुंबईकरांना त्याचा दररोज सामना करावा लागत आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास होत आहे. उंचच उंच इमारती झपाट्याने उभ्या राहत आहेत. इमारतींमध्ये वाहनतळांची व्यवस्था असली तरी वाहनांची संख्या लक्षात घेता रहिवाशांना रस्त्यावरच वाहने उभी करण्याशिवाय पर्याय नसतो, त्यामुळे अशा रस्त्यावर अनियंत्रित उभी केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक विजयेंद्र शिंदे यांनी पालिका प्रशासनाकडे ठरावाच्या मागणीद्वारे हा उपाय सुचविला आहे. मुंबईतील पालिकेचे रिकामे भूखंड, उद्याने, मैदाने अशा ठिकाणी भूमिगत बहुस्तरीय वाहनतळ प्रकल्प राबवावेत, त्यामुळे मुंबई शहरातील वाहनतळांची समस्या सोडविण्यास हातभार लागेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.