मुंबई

पश्चिम किनारपट्टीवरील गावांसाठी जीएसएम आधारित संप्रेषण यंत्रणा

CD

पश्चिम किनारपट्टीवरील गावांसाठी जीएसएम आधारित संप्रेषण यंत्रणा
पुणे, ता. १४ ः रायगड जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील आपत्तीप्रवण गावांसाठी ‘जीएसएम आधारित दोन-मार्गी सार्वजनिक सूचना व संप्रेषण यंत्रणा’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
अखिल भारतीय श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयओआयटी) अभियांत्रिकी महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आयईईई) टेक फॉर गुड आणि रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यातर्फे आपत्तीच्या काळात अखंड आणि विश्वासार्ह संप्रेषण व्यवस्था उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, नागाव, काशिद, नगाव, नांदगाव, मुरुड, अगरदांडा, दिघी, वालवटी, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, महाड, म्हसळा, पोलादपूर येथे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाकडून आपत्कालीन सूचना थेट गावांपर्यंत प्रसारित करता येतील, तसेच गावातील सरपंच किंवा स्थानिक प्रतिनिधींना परिस्थितीची माहिती त्वरित जिल्हा नियंत्रण कक्षाला पाठवता येईल, असे महाविद्यालयातर्फे सांगण्यात आले.
हा प्रकल्प महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून, प्रकल्पाच्या प्रमुख अन्वेषक डॉ. हर्षदा मगर आहेत. तर, प्रकल्पाच्या तांत्रिक अंमलबजावणीमध्ये ‘आयओआयटी’च्या ‘आयईईई’ विद्यार्थी शाखेने महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी रायगड जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आणि रेडिओ अमेच्युर क्लब ऑफ कोल्हापूरचे नितीन ऐनापुरे यांनी सहकार्य केले. प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल ‘एआयएसएसएमएस’चे मानद सचिव मालोजीराजे छत्रपती यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT