मुंबई

''सकाळ वास्तू एक्स्पो''ला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद

CD

‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद
हॉटेल टिप टॉप प्लाझा येथे प्रदर्शनाचे उद्‍घाटन; घरखरेदीची सुवर्णसंधी

ठाणे ता. १४ : गर्दीच्या कोलाहलापासून दूर, निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या घराचे तुमचे स्वप्न आता केवळ एक पाऊल लांब आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ने ठाणेकरांसाठी खास आयोजित केलेल्या ‘सकाळ वास्तू एक्स्पो’मध्ये पहिल्याच दिवशी सुखी आणि समृद्ध जीवनशैलीचे शेकडो पर्याय दिले आहेत. आलिशान व्हिला असो वा बजेटमधील हक्काचे घर टिप टॉप प्लाझा येथे ठाणेकरांनी घरखरेदीचा जणू उत्सवच साजरा केला. ‘सकाळ वास्तू एक्स्पो’ला शनिवारी (ता. १४) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्यातील हॉटेल टिप टॉप प्लाझा येथे सुरू झालेल्या या दोनदिवसीय प्रदर्शनात पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठी गर्दी करीत आपल्या स्वप्नातील घराची माहिती घेतली.

प्रदर्शनात प्रामुख्याने पुण्यातील नामवंत विकसकांचे शेकडो गृहप्रकल्प सादर करण्यात आले आहेत. ठाणे शहरापासून थोडे लांब आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरत आहे. ग्राहकांच्या बजेटनुसार १, २ आणि ३ बीएचके सदनिकांचे असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत. सदनिकांसोबतच आरामदायी बंगलो, रो-हाऊस, आधुनिक रिडेव्हलपमेंट प्रकल्प आणि गुंतवणुकीसाठी एनए प्लॉट्सचे आकर्षक पर्यायही विकसकांनी खुले केले आहेत. प्रदर्शनाचे उद्‍घाटन ‘मुंबई सकाळ’चे युनिट हेड सुभाष जैस्वाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन ‘सकाळ’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. अनेक ठाणेकर आपल्या कुटुंबासह प्रदर्शनात फिरताना आणि प्रकल्पांचे बारकावे समजून घेताना दिसून आले.

मराठी कलाकारांची भेट
शनिवारी मिळालेल्या प्रतिसादानंतर आज रविवार (ता. १५) प्रदर्शनाचा दुसरा आणि अंतिम दिवस आहे. आजच्या दिवशी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार प्रणव राव राणे आणि दिग्दर्शक मंगेश देसाई प्रदर्शनाला सदिच्छा भेट देणार आहेत. त्यामुळे घरखरेदीसोबतच कलाकारांना भेटण्याची संधीही ठाणेकरांना मिळणार आहे.

कधी व कुठे?
स्थळ : हॉटेल टिप टॉप प्लाझा, चेकनाका, ठाणे.
दिनांक : १५ मार्च २०२६
वेळ : सकाळी १० ते रात्री ८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pre-Monsoon Rain Alert India : पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट जारी, एल निनोचं संकट तरीही 2026 मध्ये धो-धो कोसळणार!

NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

पैशांच्या नाही, तर प्रेमाच्या जोरावर विजय! लोकांच्या घरी भांडी घासणाऱ्या कलिता मांझी झाल्या आमदार, २५०० रुपयांच्या पगारात कशी जिंकली निवडणूक?

हार्दिक पांड्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्स म्हणते...

Angarki Sankashti Chaturthi 2026: आसपासच्या नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सुरू करा श्रीगणेशाच्या 'या' रक्षा मंत्राचा जप

SCROLL FOR NEXT