मुंबई

प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्येतून 24 वर्षीय तरुणीची हॉटेलमध्ये आत्महत्या,

CD

प्रेमसंबंधातील नैराश्यातून तरुणीची आत्महत्या
लग्नासाठी टाळाटाळ केल्यामुळे हॉटेलमध्ये संपविले जीवन

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : प्रियकराने लग्नासाठी टाळाटाळ केल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या एका २४ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. ११) घडली. ऐरोली सेक्टर-१ मधील एका हॉटेलमध्ये प्रियकरासोबत जाऊन तेथील रूममध्ये गळफास लावून पीडितेने आत्महत्या केली. रबाळे पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या मृत तरुणीच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत तरुणीचे नाव दिव्या देवेंद्र पुरी (२४) असे असून, ती भांडूप पश्चिमेस कुटुंबीयांसह राहत होती. दिव्याचे ठाण्यातील मानपाडा भागात राहणाऱ्या आरोपी विवेक राजेश सिंग (२७) याच्यासोबत गेल्या दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते. विवेक सिंग हा दिव्याला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यासोबत वारंवार वाद घालत होता. तसेच तिच्यासोबत लग्न करण्यास टाळाटाळ करून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. बुधवारी (ता. ११) सायंकाळी हे दोघे ऐरोली सेक्टर-१ येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. विवेक सिंग हा काही वेळासाठी बाहेर गेला असताना दिव्याने हॉटेलच्या रूममधील सीलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर विवेक सिंग पुन्हा रूमवर आल्यानंतर दिव्या रूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दिव्याच्या वडिलांनी विवेक हा दिव्यासोबत लग्नास टाळाटाळ करून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याने तिने कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विविक सिंगविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT