‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहा
ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते ‘एआय परिषद २०२६’चे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ‘एआय’कडे पत्रकारांनी धोका म्हणून नाही न पाहता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे, असे आवाहन राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी शनिवारी (ता. १४) व्यक्त केले. तसेच एआयला वास्तव समजण्याची क्षमता नाही. त्यामुळे सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’चे उद्घाटन महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्यांनी एआयमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात होणारे बदल, संधी आणि आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, ‘आज पत्रकारितेत एआयचा वापर वाढत आहे. जगात काही ठिकाणी पूर्णपणे स्वयंचलित ‘वन-मॅन न्यूज रूम’ तयार होत असून, बातम्यांचे संकलन, लेखन, संपादन, फॅक्ट चेकिंग आणि पेज लेआउटसारखी कामे एआयच्या सहाय्याने केली जात आहेत. वित्त, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांतील बातम्या मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित पद्धतीने तयार होऊ शकतात. त्यामुळे पत्रकारितेतील कामकाजाची पद्धत बदलत आहे.’ या वेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी या वेळी उपस्थित होते.
नवा अभ्यासक्रम
‘तुमची नोकरी एआय घेणार नाही; पण एआय वापरणारा दुसरा माणूस तुमची नोकरी घेऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांनी नवी कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पत्रकारांना प्रशिक्षण देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकारातून लवकरच ‘एआय इन जर्नालिझम’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार असल्याचेही सिंह यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.