मुंबई

बांधकामाच्या वेळा निश्चित करा

CD

बांधकामाच्या वेळा निश्चित करा
भाजपच्या नगरसेविकेची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी बांधकामाच्या वेळेवर बंधन घालण्यात यावे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ याच वेळेत बांधकामांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांनी केली आहे.

मुंबईत २,२५० हून अधिक बांधकामे तसेच मेट्रो, एमएमआरडीए प्राधिकरण अशा विविध प्राधिकरणांची कामे सुरू आहेत. बांधकामासाठी खोदकाम होत असताना मुंबईकरांना आवाजाचा त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे वायू प्रदूषणात वाढ होत आहे. रात्रीच्या वेळी बांधकाम सुरू असल्याचे दिसून येते. मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे महापौर रितू तावडे यांनी पालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

या कामांमुळे वायू प्रदूषणात भर पडत असून ध्वनिप्रदूषणातही वाढ होत आहे. तसेच या कामांमुळे होणाऱ्या आवाजाचाही स्थानिकांना त्रास होतो. त्यामुळे या कामांच्या वेळेत बदल करण्याची मागणी भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. केरकर यांची ठरावाची सूचना सभागृहाच्या पटलावर या महिन्यात ठेवण्यात येणार आहे. सभागृहाने मान्यता दिल्यानंतर प्रशासन याची अंमलबजावणी करणार का, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT