मुंबई

डॉ. दीपक पवार यांच्याविरोधात सिनेट सदस्या शीतल शेठ देवरुखकर यांचा स्थगन

CD

डॉ. दीपक पवार यांच्याविरोधात ‘स्थगन’
प्राध्यापक, युवासेनेच्या आक्षेपानंतर प्रस्ताव मागे
मुंबई, ता. १४ : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युवासेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शीतल शेठ-देवरूखकर यांनी आज मराठी भाषा केंद्र व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दीपक पवार यांच्याविरोधात स्थगत प्रस्ताव आणला. पवार यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात टीका केल्याने त्यांच्या सेवाज्येष्ठतेची चौकशी करण्याची मागणी केली; मात्र युवासेना आणि प्राध्यापकांच्या सिनेट सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने शीतल शेठ-देवरूखकर यांना स्थगन प्रस्ताव मागे घ्यावा लागला.
एका पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ. पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यांचा बोलविता धनी दुसरा असावा. टीका करण्यापूर्वी त्यांनी विद्यापीठाची परवानगी घेतली होती का, असा प्रश्‍न विचारत पवार यांना राजकारणच करायचे असेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी शेठ-देवरूखकर यांनी केली. मराठी-अमराठी वाद निर्माण करणे हा पवार यांचा छुपा अजेंडा तर नाही ना, शहरी नक्षलवादाची सुरुवात इथूनच तर होत नाही ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
शेठ-देवरूखकर यांच्या स्थगन प्रस्तावावर युवासेनेचे सदस्य प्रदीप सावंत यांनी जोरदार आक्षेप घेत विद्यापीठात विद्यार्थीहिताचे प्रश्न सोडून असा विषय आणणेच गैर असल्याचे म्हटले. डॉ. वंदना महाजन यांनी प्राध्यापकांच्या अधिकाराचे, व्यक्तिस्वातंत्र्याचे हनन करण्यासाठी हे व्यासपीठ वापरू नका; शिवाय प्राध्यापकांच्या विरोधात असा अजेंडा चालवला जात असेल तर आमचा विरोध आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. चंद्रशेखर कुलकर्णी यांनीही विद्यापीठात हा ठराव येऊच शकत नसल्याचे सांगितले. युवासेना आणि प्राध्यापकांच्या सिनेट सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने शीतल शेठ-देवरूखकर यांना स्थगन प्रस्ताव मागे घ्यावा लागला.
----
प्रस्ताव मागे घेतल्यानंतर सिनेटला अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. ते अधिकार विद्यापीठ प्राधिकरणाकडे असून त्यानंतर हा विषय सिनेटमध्ये मांडला जाईल.
- डॉ. अजय भामरे, प्र-कुलगुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT