मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात
खालापूर, ता. १४ (बातमीदार) ः मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव वेगात कंटेनर चालवून व लेनची शिस्त न पाळल्याने पुन्हा अपघाताची घटना घडली आहे. अपघातातील कंटेनरचालकाविरुद्ध खोपोली पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास हा कंटेनर मासे घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला होता. अमृतांजन पुलाजवळ धोकादायकरीत्या कंटेनर चालविल्याने त्याचे नियंत्रण सुटले. कंटेनर रस्त्याच्या डाव्या बाजूस पलटी झाला. लेनमध्ये पलटी झाल्याने वाहतुकीस काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता. सुदैवाने या अपघातात कंटेनरचालक बचावला असून अपघाताप्रकरणी खोपोली पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक कौशिक फेंगडू हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.