मुंबई

पहिली महासभा २० मार्चला

CD

पहिली महासभा २० मार्चला
३९ विषय पटलावर मांडले जाणार
वसई, ता. १५ (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेची पहिली महासभा शुक्रवारी होणार आहे. कोरोना काळापासून प्रशासकीय राजवटीतील आरोग्य, पाणी, पावसाळ्यातील कामांसारख्या ३९ विषयांचे प्रस्ताव मार्गी लागण्याची शक्यता आहे.
वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रातील नऊ प्रभागांत २०२६-२७ वित्तीय वर्षाकरिता लोडर, पोकलेन, डम्पर, इतर यंत्रसामग्री भाडेत्तवावर घेण्याकरिता बी-२ पद्धतीने ई-निविदा मागवणे, त्यासाठी होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळावी म्हणून विषय ठेवण्यात आला आहे. तसेच पावसाळ्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांमुळे त्याच्याशी निगडित कामांचे नियोजन केले जाणार आहे. याचबरोबर आरोग्य सुविधा, पाण्याच्या बाबतीतील निर्णय, वसई-विरार शहर महापालिका पाणीपुरवठा योजना, जलवाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निविदा, पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र व उपांगाच्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी विविध रसायने पुरवठावर चर्चा होणार आहे. तसेच मलनिस्सारण केंद्र, सार्वजनिक वाचनालय अनुदान, दिव्यांग पार्क, संविधान पार्क विकसित करणे, आरक्षण जागेचा विकास, रस्त्याची डागडुजी, स्मशानभूमी, असे मुद्दे महासभेत येणार आहेत.
---------------
‘या’ विषयांना प्राधान्य
- वसई-विरार शहर महापालिका परिवहन विभाग आहे. शहरातील नागरिकांना प्रवासी सेवा देत आहे. या परिवहन समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी धोरण ठरवले जाणार आहे. त्याकरिता विषय सर्वसाधारण सभेत घेतला जाणार आहे.
- पालिकेवर प्रशासकीय राजवटीमुळे महिला व बालकल्याण समितीवर सदस्य नव्हते, परंतु आता महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम ३० अन्वये महिला व बालकल्याण समिती गठित करणे, आरोग्य समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
--------
मालमत्ता करवाढीवर चर्चा
व्यावसायिक व औद्योगिक मालमत्तांमध्ये पोटमाळा तसेच पत्राशेड असे अतिरिक्त बांधकाम असेल, तर नवीन दराने मालमत्ता कर आकारणीचे धोरण निश्चित करण्याबाबत महासभेत निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने दर आकारणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईची कोंडी सुटणार, खारघर-तुर्भे लिंक रोड कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

IND vs PAK: 'भारताच्या DNA मध्ये ट्रॉफी अन् आमच्यामध्ये फक्त पराभव...' माजी कर्णधाराने काढले पाकिस्तान क्रिकेटचे वाभाडे

Latest Marathi Live Update : Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

कोल्हापुरात पहिल्यांदाच 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त, २१ वर्षीय तरुणासह दोघांना अटक, वडील सरकारी नोकरीत

Pune Crime: पुण्यात मॉब लिंचिंग! मुस्लिम तरूण इफ्तारची तयारी करत होते, तेव्हाच १०० जण आले; काठी-कोयत्यानं हल्ला अन्... घटनेनं खळबळ

SCROLL FOR NEXT