मुंबई

महिलांच्या आरोग्यासाठी श्रमजीवी आक्रमक

CD

महिलांच्या आरोग्यासाठी श्रमजीवी आक्रमक
पालघर, ठाणे जिल्ह्यातील तहसील कार्यालयांवर आज मोर्चा
विरार, ता. १५ (बातमीदार) ः आदिवासी व कातकरी मजूर महिलांना रेशन दुकाने व अंगणवाडी केंद्रांमार्फत मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे. याच अनुषंगाने पालघर, ठाणे जिल्ह्यातील विविध तहसीलदार कार्यालयांवर सोमवारी (ता. १६) मोर्चा काढण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यात आदिवासी व कातकरी समाजातील महिला मजुरी करून उदरनिर्वाह करतात; मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मासिक पाळीच्या काळात आवश्यक असलेले सॅनिटरी नॅपकिन खरेदी करणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे अस्वच्छ कापड किंवा अपुऱ्या साधनांचा वापर करावा लागतो. यामुळे संसर्गजन्य आजार, त्वचारोग, गर्भाशयाशी संबंधित आजारांचा धोका वाढला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने शासनामार्फत रेशन दुकानदारांमार्फत गरीब कुटुंबांना धान्य उपलब्ध करून दिले जाते. त्याच पद्धतीने रेशन दुकाने तसेच अंगणवाडी केंद्रांमार्फत आदिवासी महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
----------------------------
सॅनिटरी पॅडची मागणी
आदिवासी अंत्योदय, प्राधान्य रेशनिंग कार्डधारक महिलांच्या वतीने तहसीलदार कार्यालयांवर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्यासाठी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन श्रमजीवी संघटनेचे संघटक सचिव सीता घाटाळ, संघटक सचिव पूजा सुरूम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?

Bihar Crime News : भाजप नेत्याच्या पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, मेहुणा गंभीर जखमी, भर रस्त्यात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम

Latest Marathi News Live Update : खासदार संजय राऊत पुण्यात येताच वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी

Eknath Shinde Hasan Mushrif : गोकुळ दूध संघाच्या राजकारणात एकनाथ शिंदेची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीआदी दिल्या सूचना; हसन मुश्रीफांना अप्रत्यक्ष पाठबळ

SCROLL FOR NEXT