मुंबई

जव्हारमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’

CD

जव्हारमध्ये महाराजस्व समाधान शिबिरात विविध योजनांचा लाभ

जव्हार, ता. १५ (बातमीदार) : जव्हार तालुक्यातील साखरशेत मंडळ येथील हनुमान मंदिर परिसरात शनिवारी (ता. १४) छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात पार पडले. शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराला आमदार हरिश्चंद्र भोये, उपविभागीय अधिकारी डॉ. अर्पिता धायगुडे, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच स्थानिक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. शिबिरात महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच अनेक अर्ज स्वीकारून लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व कागदपत्रे वितरित करण्यात आली. शेतकरी, शेतमजूर व नागरिकांना डिजिटल गाव नमुना ७/१२ व ८ ‘अ’ उतारे वाटप करण्यात आले. तसेच मागणी निवारण योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्याचा लाभ देण्यात आला. विविध दाखले, जात व रहिवासी प्रमाणपत्र, नाव दुरुस्ती, फेरफार आदी कामांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले. याशिवाय प्रधानमंत्री स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता हक्कपत्रांचे वितरण करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत गोल्डन आयुष्मान भारत कार्ड वाटप, कृषी विभागामार्फत पीक कर्ज, प्रधानमंत्री पीक विमा योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरातून अनेक नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित कामांना तत्काळ दिलासा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन उपयुक्त ठरत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT