एलआयजीत महानगर गॅस कनेक्शनसाठी तपासणी
नेरूळ, ता. १५ (बातमीदार) ः नेरूळ सेक्टर आठमध्ये एलआयजी वसाहतीमध्ये अण्णासाहेब पाटील गृहनिर्माण सहकारी संस्थेतील रहिवाशांना महानगर कंपनीचे गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी केली आहे. यासंबंधी महानगर कंपनी व्यवस्थापनाकडे निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी (ता. १२) महानगर गॅसकडून गॅस कनेक्शन देण्यासाठी परिसराची पाहणी करण्यात आली.
नवी मुंबईत बहुतांश ठिकाणी महानगर गॅसचे जाळे विस्तारले असून, तो माफक दरात उपलब्ध आहे. मात्र, अण्णासाहेब पाटील गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांना अद्याप या सुविधेची प्रतीक्षा होती. येथील लोकसंख्या पाहता गॅस सिलिंडरची मागणी मोठी आहे. मात्र, सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने गृहिणींची मोठी गैरसोय होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी महानगर गॅस व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत गॅस कंपनीचे झोनल ऑफिसर आचार्य यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.