मुंबई

तळोजा परिसरातून २७ किलो गांजा जप्त

CD

पनवेल, ता. १५ (वार्ताहर) : तळोजा येथील देवीचा पाडा येथे गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला तळोजा पोलिसांनी सापळा लावून अटक केली आहे. सागर चिंतामणी महन्ती (वय ६०) याच्याकडून तब्बल ३४ लाखांचा २७ किलो गांजा आणि मोठ्या प्रमाणात भांगेच्या गोळ्या जप्त केल्या आहेत.

तळोजा हद्दीत देवीचापाडा येथील गणपती रुग्णालयाच्या परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी (ता. १३) मध्यरात्री १२.१५च्या सुमारास सापळा लावला होता. या ठिकाणी सागर हा पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन आला असताना, त्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे काही प्रमाणात गांजासदृश पदार्थ मिळून आला. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने राहत्या घरीदेखील अमली पदार्थांचा साठा करून ठेवल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये तब्बल २७.२०५ किलो, १३.८२५ किलो भांगेच्या गोळ्या, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व इतर साहित्य आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलासोबत उपमुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली

SCROLL FOR NEXT