मुंबई

समिती सभापती निवडीसाठी १८ मार्चला विशेष सभा

CD

पालिकेत स्थायी समिती सभापती निवडीसाठी १८ मार्चला विशेष सभा
पनवेल, ता. १५ (बातमीदार) : पनवेल महापालिकेतील स्थायी समिती आणि महिला-बालकल्याण समितीच्या सभापती निवडीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या बुधवारी (ता. १८) या समित्यांच्या सभापती निवडीसाठी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, नवीन सभापती कोण होणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
पनवेल येथील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ही विशेष सभा पार पडणार आहे. या सभेचे अध्यक्षस्थान ठाणे जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ भूषवणार आहेत. दोन्ही समित्यांच्या सभापतींची निवड समिती सदस्यांमधून करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी नामनिर्देशन, अर्जांची छाननी आणि आवश्यकतेनुसार मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून दिली आहे. १८ मार्चला होणाऱ्या या विशेष सभेमुळे पनवेलमधील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT