‘अर्घ्य २०२६’ स्वरमैफलीत ३० कलाकारांचा संगम
मुंबई, ता. १५ : भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेचा भव्य अनुभव रसिकांना देण्याच्या उद्देशाने ‘अर्घ्य इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फाईन आर्ट फाउंडेशन’ तर्फे ‘अर्घ्य २०२६’ या विशेष स्वरमैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ मार्च रोजी संध्याकाळी ६.३० वाजता वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम रंगणार आहे.
या मैफलीत विविध घराण्यांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे ३० कलाकार एकत्रित सादरीकरण करणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. या कार्यक्रमात सतारवादक पंडित रवी चारी, गायक पंडित राम देशपांडे, बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी, तबलावादक पंडित योगेश साम्सी आणि पखवाजवादक कृष्णा साळुंके हे मान्यवर कलाकार आपल्या शिष्यांसह एकाच मंचावर सादरीकरण करणार आहेत. गुरू आणि शिष्य एकत्र येऊन संगीताची परंपरा जपण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत तिचा वारसा पोहोचवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. या स्वरमैफलीला पद्मश्री तालयोगी सुरेश तळवलकर यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लाभणार आहे. विविध वाद्ये आणि गायनाच्या माध्यमातून राग आणि ताल यांचा सुसंवाद साधणारा हा कार्यक्रम शास्त्रीय संगीताच्या अभ्यासकांसह रसिकांसाठीही विशेष ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संगीतप्रेमी आणि रसिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताचा सामूहिक अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.