मुंबई

सारडे गावातील नागरिकांची फसवणूक

CD

नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : उरणमधील पिरकोन गावात तीन वर्षांपूर्वी घडलेला कोट्यवधींच्या चिटफंड घोटाळ्याच्या आठवणी ताज्या असतानाच आता सारडे गावामध्ये आणखी एक चिटफंड घोटाळा उघडकीस आला आहे. या घोटाळ्यातील संशयितांनी जादा परताव्याचे प्रलोभन दाखवून १७ गुंतवणूकदारांकडून तीन कोटी ३० लाखांची फसवणूक करून पलायन केले आहे. उरण पोलिसांनी या प्रकरणातील एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण नारायण पाटील (वय ४६), विनायक नारायण पाटील (वय ४३) आणि कमिक्षा विनायक पाटील (वय ३७) हे सारडे गावातील रहिवासी असून, त्यांनी वर्षभरापूर्वी चिटफंड नावाची एक गुंतवणूक योजना सुरू केली होती. या योजनेत ११ हजार रुपये गुंतवल्यास १५ दिवसांनंतर १९ हजार रुपये परतावा दिला जाईल, असा विश्वासदेखील त्यांनी गुंतवणूकदारांना दिला होता. त्यांनी सुरुवातीला काही लोकांना परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गावातील अनेक लोकांकडून मोठी रक्कम गोळा केली.

या प्रकरणातील तक्रारदार अदिती पाटील यांनी या चिटफंडमध्ये २६ लाख गुंतवले होते. त्यांच्याप्रमाणेच गावातील इतर १७ प्रमुख गुंतवणूकदारांसह अनेक लोकांनी एकूण तीन कोटी ३० लाख ६६ हजार रुपये गुंतवले होते. मात्र, मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांनी आपल्या पैशांची मागणी करण्यास सुरुवात केल्यानंतर संशयितांनी आपल्या घराला कुलूप लावून नातेवाइकांसह गावातून पळ काढला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा संपर्क होत नसल्याने अखेर फसवणूक झालेल्या ग्रामस्थांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20I World Cup 2026: भारताचा सराव सामन्यात दमदार विजय; राधा-श्रेयंकाच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजने टेकले गुडघे

Thane News: कल्याणमध्ये ऐतिहासिक शिल्पांचा शोध, हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडला

Philippines earthquake: फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप! ३२ जणांचा मृत्यू, दोनशेंपेक्षा अधिक जखमी

Kalyan: कल्याणमध्ये मोठा राडा! टोळक्याकडून रिक्षाचालकाला मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Visakhapatnam: स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात! वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडलं; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT