मुंबई

धान्य खरेदीचे पैसे रखडले

CD

धान्य खरेदीचे पैसे रखडले
विक्रमगडमधील शेतकरी आर्थिक अडचणीत
विक्रमगड, ता. १५ (बातमीदार)ः महाराष्ट्र राज्य सहकारी धान्य खरेदी महामंडळ अंतर्गत जव्हार प्रादेशिक कार्यालयामार्फत जानेवारी २०२६ पासून शेतकऱ्यांकडून उत्पादित धान्य (भात) खरेदीस सुरुवात करण्यात आली. नव्या नियमावलीनुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान्य ठरवून दिलेल्या खरेदी केंद्रांवर जमा केले, पण एक ते दीड महिना उलटूनही बँक खात्यावर पैसे जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत भात खरेदी केंद्रावर पोहोच केला. धान्य खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना केंद्रावरच अधिकृत पावत्या देण्यात आहे. त्यामध्ये धान्याचे वजन, प्रतिक्विंटलचा भाव, देय असलेली रक्कम नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या विक्रीची अधिकृत नोंद उपलब्ध झाली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी पीककर्ज, पेरणी खर्च, इतर शेतीविषयक गरजांसाठी बँका व पतसंस्थांकडून कर्ज घेतले आहे. शासनाच्या नियमानुसार मार्च अखेरपर्यंत कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत तसेच ५० हजार रुपयांपर्यंत शासन अनुदानाचा लाभ मिळतो, परंतु धान्यविक्रीचे पैसे मिळाले नसल्याने कर्जफेड करणे कठीण झाले आहे. परिणामी, अनेक शेतकरी शासनाच्या सवलतींपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
------------------------------------
दुहेरी आर्थिक संकट
धान्यविक्री करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. एका बाजूला शेतीखर्च वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला हक्काचे पैसे रखडले आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, असे मत शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
-------------------------------------
६२ लाखांची देयके थकीत
विक्रमगड केंद्रातून २,६०० क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले आहे, तर या प्रक्रियेत १५२ शेतकरी सहभागी झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांची मिळून ६२ लाख २० हजार २४६ रुपयांची देयके प्रलंबित आहेत. त्यामुळे जव्हार प्रादेशिक कार्यालयाने प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रलंबित देयके २० मार्च पूर्वी खात्यावर जमा करावीत, अशी मागणी विक्रमगड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम आळशी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT