मुंबई

महापे येथील लॉजमधून पीडित महिलेची सुटका

CD

नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : महापे येथील इलेक्ट्रिक झोन परिसरातील एका लॉजमध्ये बेकायदा सुरू असलेल्या कुंटणखान्यावर तुर्भे पोलिसांनी छापा टाकून एका महिलेची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महापे इलेक्ट्रिक झोनमधील हॉटेल शुभम पार्क रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालवण्यात येत असल्याची माहिती तुर्भे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी हॉटेल शुभममध्ये छापा टाकला. या वेळी हॉटेलचा मालक, व्यवस्थापक आणि वेटर संगनमत करून पीडित महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत उघड झाले. पोलिसांनी हॉटेलमधील रोखपाल विजेंद्र भोजा पुजारी (वय ४०) आणि वेटर कमरुद्दीन निजामुद्दीन अन्सारी (वय ४९) यांना अटक केली. या गुन्ह्यात हॉटेलचा मालक गोविंद आर. पुजारी आणि मनोज पुजारी यांचाही सहभाग असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून १५,७२० रुपयांचा मुद्देमाल, तसेच मोबाईल फोन व इतर आक्षेपार्ह साहित्य हस्तगत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Renewal Process : 1 एप्रिलपासून महागणार FASTag वार्षिक पास; आत्ताच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी, पाहा सोपी ऑनलाइन पद्धत

LPG Gas : गॅस टंचाईचा मासेमारी क्षेत्राला फटका; बर्फ उत्पादनावर परिणाम, नौका जेटीवर उभ्या

Latest Marathi Update : जालन्यातील घनसावंगी पुरवठा विभागाची धडक कारवाई, 7 घरगुती गॅस सिलिंडर जप्त

श्रीदेवी यांचा जाच करायची सासू, प्रेग्नेंट असताना पोटावर मारलेला बुक्का, घर फोडणारी बाई म्हणून मारायची टोमणे

एसटी बँकेच्या वादाची परंपरा कायम, गोडसेचा अखंड भारताचे विधाते म्हणून उल्लेख; अनेकांचा आक्षेप

SCROLL FOR NEXT