मुंबई

सिलिंडर बुकिंगमध्ये तिपटीने वाढ

CD

बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : दररोज सुमारे ८०० सिलिंडर बुकिंग होत होते. सध्या ते वाढून तब्बल दोन हजारापर्यंत पोहोचले आहे. अनेक ग्राहकांकडे गॅस पाइपलाइन असतानाही ते अतिरिक्त सिलिंडर बुक करीत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वितरणात अडचणी निर्माण होत असल्या तरी प्रत्यक्षात शहरात गॅसचा तुटवडा नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत प्रशासन, पोलिस अधिकारी आणि शहरातील सर्व गॅस एजन्सी मालकांची बैठक घेण्यात आली. नागरिकांनी घाबरून जाऊन जादा सिलिंडर मागवू नयेत अन्यथा काळाबाजार सुरू होण्याची शक्यता असल्याचा इशारा देत अशा प्रकारांना आळा घालण्याचे निर्देश एजन्सींना देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १३) घरगुती व व्यावसायिक गॅसपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी आदेश दिले आहेत. पुढेही गॅस मिळण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचेही सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांच्याकडून सांगण्यात आले.

या बैठकीला प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अमित पुरी, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे, बदलापूर पूर्व व पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन पाटील, किशोर शिंदे तसेच शहरातील गॅस एजन्सी मालक उपस्थित होते.

शहरात सिलिंडरचा तुटवडा नाही!
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरत आहेत; मात्र शहरात सिलिंडरचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले. या अफवांमुळे अनेक नागरिक एकापेक्षा जास्त सिलिंडरची मागणी करीत असल्याने एजन्सींवर अचानक ताण वाढला आहे.

गॅसपुरवठ्याबाबत प्रशासन सतत लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आवश्यक तेवढाच गॅस मागवावा. शहरात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण व्यवस्थित करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात आहेत.
- विजयानंद शर्मा, प्रांताधिकारी

गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत शहरात पसरत असलेल्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. नागरिकांनी घाबरून एकापेक्षा जास्त सिलिंडरची मागणी करू नये. प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि गॅस एजन्सी मालक यांच्या समन्वयातून गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात अशी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे त्यावर तातडीने तोडगा काढतील.
- रुचिता घोरपडे, नगराध्यक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT