मुंबई

मालवणीत सर्वधर्मीय इफ्तारचा सुंदर संगम

CD

मालवणीत सर्वधर्मीय इफ्तारचा सुंदर संगम
हिंदू महिलांनी बनवले इफ्तारचे पदार्थ; सामाजिक एकोप्याचा संदेश
मालाड, ता. १५ (बातमीदार) ः सफल विकास वेलफेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दल, मालवणी काचपाडा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रमजाननिमित्त सर्वधर्मीय इफ्तार पार्टी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमातून धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोपा याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.
या इफ्तार पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे मालवणी परिसरातील हिंदू धर्मीय महिलांनी स्वतःच्या घरातून इफ्तारसाठी विविध पदार्थ बनवून आणले होते. रंजना कनोजिया यांनी उपवासाचे साबुदाणा वडे, सिद्धेश्वरी शर्मा यांनी छोट्या आकाराच्या गुळाच्या करंज्या, सोमा बाबू डे यांनी बंगाली पद्धतीचे चना-चाट, तर मराठमोळी वीरांगना साळवे यांनी आलू-चाट बनवून आणले. तसेच अनिता कनोजिया यांनी गुजराती लोकांच्या आवडीचे खमण ढोकळा, शालिनी शर्मा यांनी गोल भजी, तर रेखा कोटक यांनी नारळाची वडी तयार करून आणली. कुसुम उघडे यांनी पालक भजी, तर शारदा खडतरे आणि नुरी शेख यांनी खजूर आणून इफ्तार कार्यक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मनोज परमार, कृष्णा वाघमारे, मेरी चेट्टी, राजेश राखपसरे, नीलम शिंदे आणि अंजली डे यांनी विशेष सहकार्य केले. जैन धर्मीय अमित विकूल घेलानी यांनी त्यांच्या रेडीमेड गारमेंट कारखान्यात रोजा इफ्तारसाठी जागा उपलब्ध करून दिली. याप्रसंगी ज्‍येष्‍ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे, ज्योती पुण्यानी, ज्येष्ठ राष्ट्र सेवा दल कार्यकर्ते शरद कदम, सिरत सातपुते, अतुल आपटे, निमेश दवे, स्टॅनली फर्नांडिस उपस्थित होते. फिरोज सय्यद, अफरोज अन्सारी, अफजल अन्सारी, नुरी शेख, स्वामी प्रताप, अर्चना शिंदे, दीपाली व निशा शिंदे, इम्रान शेख, इम्रान खान, शफी शेख, अरविंद तिवारी, शारिक शेख यांच्यासह अनेक समाजबांधवांनी सहभाग घेत विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमात जैन धर्मीय तसेच अनेक हिंदू धर्मीय बांधव सहभागी होत असल्याने इफ्तार कार्यक्रमात मांसाहारी पदार्थ दिले जात नाहीत. सर्वांच्या भावना जपण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जातो.
भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचे पालन करीत सर्वधर्मीय एकोपा जपण्याचा प्रयत्न आम्ही अनेक वर्षांपासून करीत आहोत. हा प्रयत्न छोटा असला तरी सर्वधर्मीयांना एकत्र आणून परस्परांप्रति आदरभाव वाढवण्यास मदत होते, असे मत सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या सचिव वैशाली महाडिक यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT