ठाणे, ता. १५ : दुचाकीचे शिकाऊ वाहन परवान काढून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भिवंडी येथील काल्हेर परिसरातील खासगी एजंटला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच मागणाऱ्या एजंटचे नाव कृष्णकुमार सत्यनारायण मिश्रा (वय ४४) असे आहे. तक्रारदाराने १० मार्चला दुचाकीचे शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी मिश्रा यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांनी स्वतःसाठी आणि आरटीओ अधिकाऱ्यांसाठी मिळून पाच हजार रुपये लागतील, असे सांगितले. मात्र, प्रत्यक्ष शासकीय शुल्क केवळ २०० रुपये असल्याचे समजल्यानंतर तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असता मिश्रा यांनी ७०० रुपये शासकीय शुल्क म्हणून घेतले आणि उर्वरित ४ हजार ३०० रुपये देण्यास सांगितले. त्यानुसार १२ मार्चला वागळे इस्टेट येथील त्यांच्या कार्यालयात सापळा रचून दुपारी १.३० वाजता मिश्रा यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.