मुंबई

निधन वार्ता

CD

माजी शिक्षण सभापती चंद्रशेखर सतविडकर यांचे निधन
मुरूड (बातमीदार) : मुरूड नगर परिषदेचे माजी शिक्षण सभापती व मुरूड तालुका भंडारी बोर्डिंगचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर सतविडकर (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मुरूड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे सतविडकर हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते नेहमी पुढाकार घेत असत. त्यांचा अंत्यविधी पनवेल येथे पार पडला. या वेळी समाजातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
------------------------
मजगावचे माजी सरपंच राजाभाई आयरकर यांचे निधन
मुरूड (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील मजगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते राजाराम गंगाराम ऊर्फ राजाभाई आयरकर यांचे शनिवारी (ता. १४) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. आयरकर यांनी सलग सुमारे २० वर्षे मजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची धुरा सांभाळली होती. सहजीवन विद्या मंडळ संचालित यशवंतनगर हायस्कूलचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नाभिक समाजातील विविध पदांवरही त्यांनी काम केले होते. त्यांच्या पश्चात चार विवाहित पुत्र, चार विवाहित कन्या, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले असून त्यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : अंबादास दानवेंसाठी काँग्रेसनं घेतली माघार; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा देताना 'मविआ'मध्ये नक्की कोणती झाली 'डील'?

Artificial Mango Ripening : सावधान! तुम्ही खाल्लेला आंबा नैसर्गिक की केमिकलने पिकवलेला? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Love Numerology : प्रेमात पक्के 420 असतात 'या' 3 मुलांकाचे लोक; तुमच्या पाठीत कधी खंजीर खुपसतील कळणारही नाही

Latest Marathi News Live Update : भाजप सर्व राज्यांमध्ये विजयी होईल- स्वाती मालीवाल

India Census 2026 : राज्यात १ मे पासून जनगणना, विचारले जाणार 'हे' प्रश्न; चुकीची माहिती दिल्यास होणार तब्बल 'इतका' दंड

SCROLL FOR NEXT