मुंबई

वाणिज्य मालमत्तांचा कर वाढणार ?

CD

वाणिज्य मालमत्तांचा कर वाढणार?
घनकचरा व्यवस्थापन शुल्क द्यावे लागणार
सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : नवी मुंबई महापालिकेतर्फे लवकरच घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्कातून रहिवासी मालमत्तांना सूट दिली आहे. परंतु, व्यावसायिक, वाणिज्यिक आणि रुग्णालयांना घनकचरा शुल्क द्यावे लागणार असल्याने मालमत्ता कर वाढणार आहे. त्यामुळे गेली २० वर्षे मालमत्ता कर न वाढवण्याचे सत्ताधाऱ्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी नवी मुंबई शहराचे मालमत्ता कर गेली २० वर्षे वाढणार नाही आणि यापुढेदेखील वाढणार नाही, असा दावा निवडणुकीत केला आहे. मात्र, गेली अनेक वर्षे मालमत्ता करवाढ न केल्यामुळे आर्थिक विवंचनेत असणाऱ्या महापालिका प्रशासनाने वेगळ्या पद्धतीने कर गोळा करण्याची युक्ती लढवली आहे. महापालिकेमार्फत शहरातून जो कचरा गोळा केला जातो. त्या कचऱ्यावर अधिभार लावण्यात येणार आहे. पूर्वी मालमत्ता करात एकूण मुळ्याच्या १० टक्के कचरा कर घेतला जात होता. त्यामुळे तो प्रत्येकाच्या मालमत्ता आकारानुसार वेगवेगळा ठरत होता. मात्र, आता महापालिका प्रशासनाने नव्याने तयार केलेल्या प्रस्तावात १०० किलोग्रामपेक्षा कमी असणाऱ्या आस्थापनांना घनकचरा व्यवस्थापन शुल्क आकारण्यात येणार आहे. यात रहिवासी वापराच्या मालमत्तांना सूट देण्यात आली आहे. परंतु, व्यावसायिक, वाणिज्यिक आणि रुग्णालयीन आस्थापनाना शुल्क अदा करावे लागणार आहे. या शुल्कामुळे लोकप्रतिनिधींकडून विरोध होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव प्रशासनातर्फे सादर केला जाणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर ही नवीन करवाढ लागू होणार आहे. गेली अनेक वर्षे नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर वाढवलेला नाही. अशा परिस्थितीत महापालिकेचा आस्थापनेवर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात भविष्यात नवीन प्रकल्प होऊ घातलेले आहेत. या सर्वांचा आर्थिक डोलारा सांभाळायची तारेवरची कसरत महापालिका प्रशासनाला करावी लागणार आहे.

आस्थापने कर
दुकाने, दवाखाने ६० रुपये प्रति महिना
विविध उपकरणाची शोरूम १२० रुपये
गोदाम १२० रुपये
उपाहारगृह आणि हॉटेल १२० रुपये
राहण्याची आणि जेवण्याची सोय असणारे हॉटेल १६० रुपये
विवाह कार्यालये आणि मनोरंजन सभागृह, सिनेमागृह १,००० रुपये
खरेदी केंद्र, मॉल आणि माल्टिप्लेक्स १,५०० रुपये
हंगामी दुकाने, मेला, सत्संग, खाद्य महोत्सव प्रति दुकान १०० रुपये

१४ गावांना महापालिकेचा कर लागणार?
नवी मुंबई महापालिकेत नव्याने समावेश झालेल्या १४ गावांना महापालिकेचा मालमत्ता कर आकारला जाणार आहे. ही गावे महापालिकेत समावेश झाल्याच्या तारखेपासून एक वर्ष ग्रामपंचायतीने लागू केलेला कर आकारला जाणार आहे. नंतरच्या दुसऱ्या वर्षी या करात २० टक्क्यांनी वाढ होणार आहे. मार्च २०२६ नंतर सामान्य कराच्या ४० टक्के मालमत्ता कर आकारला जाणार आहे. नंतर टप्प्याटप्प्याने वाढ होत जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT