मुंबई

भाजपाच्या वतीने कॉग्रेस नेते राहूल गांधी आणि सहका:यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

CD

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि
सहकाऱ्यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली ता. १५ ः संसद भवनच्या ‘मकर द्वार’ परिसरात काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच चहा-बिस्किटांसह ‘चहा पार्टी’ केली. यामुळे संसदेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करत, काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात भाजप कल्याण जिल्ह्याच्या वतीने रविवारी (ता. १५) सकाळी डोंबिवलीत जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौकात आणि कल्याणमधील काटेमानिवली परिसरात भाजपच्या वतीने घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला.
संसद भवनच्या ‘मकर द्वार’ परिसरात चहा पार्टी झाल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. लोकशाहीच्या मंदिराची प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक खासदाराची जबाबदारी आहे. लोकशाही संस्थांचा मान राखला गेला पाहिजे आणि नियम सर्वांसाठी सारखे असले पाहिजेत, अशी भूमिका भाजपच्या वतीने घेण्यात आली. संसदेची प्रतिष्ठा कायम राखली जावी आणि नियमांचे पालन केले जावे, अशी मागणी या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
-------
कल्याण पूर्वेतही आंदोलन
राहुल गांधी आणि काँग्रेसच्या काही खासदारांनी संसदेतील मकर द्वार परिसरात नियमांचे उल्लंघन करत तेथे वेढा घालून चहा पार्टी केल्याने या कृतीमुळे संसदेची प्रतिष्ठा धोक्यात आल्याचा आरोप करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व येथील काटेमानिवली चौकात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT