मुंबई

महसूल समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

शासकीय सेवा मिळाल्या एकाच छताखाली
‘महाराजस्व’ समाधान शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
कल्याण, ता. १६ (बातमीदार) : सामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नये, या उद्देशाने कल्याण तहसीलदार कार्यालयामार्फत आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला कल्याण पूर्वेतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी (ता. १४) नूतन ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे हे शिबिर उत्साहात पार पडले.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या विशेष अभियानात शेकडो नागरिकांनी आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करून घेतला. उत्पन्न, रहिवास, अधिवास (डोमिसाईल) आणि जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भूमी अभिलेखची ७/१२ आणि ८-अ उतारा मिळवणे, तसेच ७/१२ मधील किरकोळ दुरुस्तीची कामे जागेवरच मार्गी लावण्यात आली. शिधापत्रिकेतील नाव बदलणे, नवीन नोंदणी आणि दुरुस्तीसाठी स्वतंत्र कक्षाद्वारे सेवा देण्यात आली. तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठी आवश्यक ई-केवायसी आणि शासनाच्या योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय सेवा थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. एकाच छताखाली सर्व दाखले आणि कागदपत्रे मिळाल्याने आमचा वेळ आणि हेलपाटे वाचले आहेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

प्रशासकीय तत्परतेचे दर्शन
तहसीलदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले. ज्या अर्जांची कागदपत्रे पूर्ण होती, त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात आली. प्रशासकीय पारदर्शकता आणि कामाचा वेग पाहून उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT